३०० दलितांनी स्वीकारला बौद्ध धर्म
By admin | Published: October 13, 2016 04:59 AM2016-10-13T04:59:14+5:302016-10-13T04:59:14+5:30
राज्यातील ३०० हून अधिक दलित नागरिकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. उना प्रकरणानंतर यंदा विजयादशमीच्या मुहुर्तावर बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या
अहमदाबाद : राज्यातील ३०० हून अधिक दलित नागरिकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. उना प्रकरणानंतर यंदा विजयादशमीच्या मुहुर्तावर बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
राज्यातील २०० हून अधिक नागरिकांनी वेगवेगळ्या तीन कार्यक्रमात बौद्ध धर्म स्वीकारला. तर, अन्य ९० जणांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बौद्ध धर्म स्वीकारला. आयोजकांनी सांगितलूे की, विजयादशमीच्या मुहुर्तावर दरवर्षी लोक बौद्ध धर्म स्वीकारतात. पण, यावर्षी उना दलित हिंसाचारानंतर या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हा समारंभ आयोजित करणाऱ्या गुजरात बुद्धिस्ट अकॅडमीचे सदस्य रमेश बांकेर यांनी सांगितले की, अहमदाबादच्या दानी लिमडा येथे दसऱ्याच्या निमित्त कार्यक्रमात १४० नागरिकांनी तर, गांधीनगरच्या कलोल येथे एका कार्यक्रमात ६५ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला. सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या वाधवन येथे ११ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला. (वृत्तसंस्था)