पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 09:59 AM2017-09-27T09:59:51+5:302017-09-27T10:03:31+5:30

पाकिस्तानात टॉमेटो 300 रूपये प्रतिकिलोने विकला जातो आहे.

300 kg of tomatoes in Pakistan; Statement of Food Security Ministers that India will not buy Tomato | पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देपाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत

लाहोर- पाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. तेथे टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तरीही भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली. शेजारील देशाबरोबर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने पाकिस्तानमधील सरकार कुठल्याही परिस्थितीत भाज्यांची आयात करणार नसल्याची माहिती समोर येते आहे. दरवर्षी भारतातून मागविलेल्या भाज्यांमुळे पाकिस्तानातील बाजारातील भाज्यांची मागणी पूर्ण होते. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आयात कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. लाहोर आणि पंजाबमध्ये 300 रूपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री होते आहे. तर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये टोमॅटो 200 रूपये किलोने विकले जात आहेत.दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट येत्या काही दिवसांतच संपेल. बलुचिस्तानमधून लवकरच माल बाजारात येणार असल्याचं अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात  बोसन यांनी म्हंटलं आहे. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लाहोर, पंजाब प्रांतातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये टॉमेटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील बाजारांमध्ये टॉमेटो १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. तसेच सरकारने टॉमेटोचे दर १३२-१४० रुपये प्रतिकिलो निश्चित केला होता. भारताकडून टॉमेटो आयात न करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (LCCI) स्वागत केलं आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदतच होणार आहे, असे एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हटलं आहे. हा निर्णय योग्यच असल्याचं  एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हंटलं आहे. 
 

Web Title: 300 kg of tomatoes in Pakistan; Statement of Food Security Ministers that India will not buy Tomato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.