३०० काश्मिरी तरुणांची लष्करात नवी फलटण
By admin | Published: August 19, 2016 05:24 AM2016-08-19T05:24:38+5:302016-08-19T05:24:38+5:30
‘आझादी’च्या घोषणा देत आणि भारताच्या व सैन्यदलांच्या विरोधात संताप व्यक्त करत काश्मीरमध्ये एकीकडे गेले महिनाभर असंतोष उसळलेला असताना दुसरीकडे भारताची एकता
श्रीनगर : ‘आझादी’च्या घोषणा देत आणि भारताच्या व सैन्यदलांच्या विरोधात संताप व्यक्त करत काश्मीरमध्ये एकीकडे गेले महिनाभर असंतोष उसळलेला असताना दुसरीकडे भारताची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची शपथ घेत ३०८ काश्मिरी तरुण गुरुवारी भारतीय लष्करात दाखल झाले.
लष्कराच्या जम्मू अॅण्ड
काश्मीर लाइट इन्फंट्रीच्या रेजिमेंटमध्ये फक्त जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील तरुणांची भरती केली जाते. या नव्या फलटणीत काश्मीर खोरे आणि जम्मूच्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागांमधील १११ जवान आहेत.
श्रीनगर शहराच्या बाहेर रंगरेथ येथील परेड मैदानावर झालेल्या या संचलनाला राज्याचे राज्यपाल एन. एन. व्होरा व लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प््सचे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल सतीश दुवा उपस्थित
होते. (वृत्तसंस्था)