बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:31 AM2019-04-04T10:31:50+5:302019-04-04T10:34:10+5:30

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांनी केला मोठा दावा केला आहे.

300 terrorists killed in Balakot airstreak, wing commander Abhinandan's father Claim | बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

Next

चेन्नई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबत सुरुवातीपासूनच उलटसुलट दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर टाकण्यात आलेल्या गायडेड स्पाइस-2000 या बॉम्बमुळे सुमारे 250 ते 300 दहशतवादी मारले गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली. 

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.  

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांचे वडील  एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी आयआयटी मद्रासच्या डिफेन्स स्टडीजच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मोठे भाष्य केले. भारतीय हवाई दलाने जेव्हा एअर स्ट्राइक केले तेव्हा बहुतांश दहशतवादी हे तळामध्येच होते. या हल्ल्यात इमारतीचे फार नुकसान झाले नसावे मात्र बॉम्ब उशिरा फुटल्याने अधिकाधिक दहशतवादी मारले गेले असावेत.'' असे त्यांनी सांगितले. 

''पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली एफ-16 विमाने आणि त्यावर बसवण्यात येणारी AMRAAM क्षेपणास्त्रे भारतासाठी धोकादायक आहेत. बालाकोटवर चढाई करताना एफ-16 विमानांना गुंगारा देऊन पारिस्तानी विमाने दुसऱ्या दिशेला जातील याची व्यवस्था करणे आमच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळे हवाई दलाने सात विमाने जैश ए मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरच्या दिशेने पाठवली. त्यामुळे भारतीय हवाई दल बहावलपूरवर हल्ला करतेय, असे पाकिस्तानला वाटले. त्यामुळे त्यांनी या विमानांना रोखण्यासाठी एफ 16 विमाने पाठवली. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची काही विमाने बालाकोटकडे गेली आणि यशस्वीपणे हल्ला करून परत आली. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाची पूर्णपणे फसगत झाली.''अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी दिली. 

''पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी भारताकडून नक्कीच प्रतिहल्ला करण्यात येईल, याची जाणीव पाकिस्तानला होता. त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी ठेवही होती. मात्र आम्ही त्यांच्या हद्दीत घुसून हल्ला करू, असे त्यांना वाटले नव्हते,'' असा दावाही त्यांनी केला. तसेच एअर स्ट्राइकबाबत माझा हा अंदाज आहे. कदाचित तो चुकीचाही असू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 
 दरम्यान, बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकनंतर देशात मृत दहशतवाद्यांच्या संख्येवरून उटल सुलट चर्चा सुरू आहे. या एअर स्ट्राइकमध्ये 250 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमे तसेच सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि पाकिस्तानचा हवाला देऊन पुरावे मागण्यात येत आहेत. 

Web Title: 300 terrorists killed in Balakot airstreak, wing commander Abhinandan's father Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.