काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सक्रिय

By Admin | Published: April 24, 2017 10:57 AM2017-04-24T10:57:59+5:302017-04-24T10:57:59+5:30

दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

300 Whatsapp Group active for stone pelting in Kashmir | काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सक्रिय

काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सक्रिय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र या दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशनमध्ये अडथळा आणण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी तरुणांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून भडकावलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जवळपास 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवलं जातं. त्यातील 90 टक्के व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हे बंद झाल्याची माहितीही एका पोलीस अधिका-यानं दिली आहे. दरम्यान 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जवळपास 250 सदस्य होते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणा-या तरुणांना एकत्र केलं जातं होतं आणि सुरक्षा दलांच्या ऑपरेशनला अडथळा आणण्यासाठी दगडफेक करण्यात येते.

विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहित करणा-या ग्रुप अ‍ॅडमिनची पोलिसांना ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना काऊंसलिंगसाठीही बोलावलं आहे. आमच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जवळपास 90 टक्क्यांहून अधिक ग्रुप बंद झाल्याचा दावा एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. इंटरनेट सेवा खंडित केल्यामुळे दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच यासाठी त्यांनी बडगाम जिल्ह्यात झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा हवाला दिला आहे. शनिवारी बडगाम जिल्ह्यात चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यावेळी तिथे फक्त मूठभर तरुणच सुरक्षा दलांवर दगडफेक करत होते. या दगडफेकीत आतापर्यंत डझनांहून अधिक तरुणांना सुरक्षा जवानांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. मात्र इंटरनेट सेवा खंडित केल्यानं जम्मू-काश्मीरमधल्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Web Title: 300 Whatsapp Group active for stone pelting in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.