३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

By admin | Published: November 3, 2016 06:35 AM2016-11-03T06:35:49+5:302016-11-03T06:35:49+5:30

कारखान्यावर धाड टाकून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांचा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा साठा जप्त केला.

3,000 crores of substance seized | ३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

३ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

Next


नवी दिल्ली : उदयपूर येथील एका कारखान्यावर धाड टाकून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांचा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा साठा जप्त केला. अमली पदार्थांची एवढ्या मोठ्या प्रमाणातील देशातील ही पहिलीच जप्ती असावी. या प्रकरणी बॉलीवूड निर्माता सुभाष दुधानी याला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी मरुधर ड्रिंक्स या कारखान्यावर धाड टाकली आणि बंदी असलेल्या मॅण्ड्रेक्स टॅब्लेटस्च्या खोक्यांनी भरलेल्या खोलीचा छडा लावला. या खोलीत तब्बल २ कोटी मॅण्ड्रेक्स टॅब्लेटस् होत्या. २३.५ मेट्रिक टन एवढे वजन असलेल्या या टॅब्लेटस्चे तब्बल तीन हजार रुपये कोटी एवढे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य आहे. डीआरआयने जप्त केलेला हा अमली पदार्थाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा आहे, असेही ते म्हणाले. डीआरआय सीबीईसीची शाखा आहे.
आम्ही सूत्रधाराला अटक केली असून, इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. सुभाष दुखानी याने काही बॉलीवूड चित्रपटांची निर्मिती केली असून, मुंबईत त्याच्या काही मालमत्ता आणि व्यावसायिक प्रतिष्ठानेही आहेत, असे शाह यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या सक्रिय मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
मॅण्ड्रेक्स, एम-पील्सस बटन्स किंवा स्मार्टीज् या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ गांजात मिसळून ओढला (धूम्रपान) जातो. आफ्रिका व आशियात मौजेखातर ओढण्यात येणारा हा पदार्थ राजस्थानात तयार केला होता. तो थेट मोझाम्बिक किंवा दक्षिण आफ्रिकेला पाठविला जाणार होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>५ वर्षांतील कारवाई
गेल्या ५ वर्षांत डीआरआयने ५४० किलोहून अधिक हेरॉईन आणि ७,४०९ किलो इफेड्रीन आणि इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत.
डीआरआयने विविध राज्यांत धाडी टाकून मेफेड्रोन, केटामाईन, अलप्राझोलम आणि इफेड्रीन यासारखे अमली पदार्थयुक्त औषधी बनविणारे १० कारखाने उद्ध्वस्त केले आहेत.

Web Title: 3,000 crores of substance seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.