पालिकेच्या तीन अधिकार्यांना ३७ हजारांचा दंड माहिती न दिल्याचे भोवले : आयुक्तांंकडूनही मागितला खुलासा
By Admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:18+5:302015-09-01T21:38:18+5:30
राजू काळे
र जू काळेभाईंदर : पालिकेच्या विविध विभागांची माहिती, माहिती अधिकारांर्गत मागूनही ती मुदतीत न दिल्याने आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या अपिलानुसार पालिकेच्या तीन अधिकार्यांना विभागिय माहिती आयुक्तांनी ३७ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच दोषी अधिकार्यांवर राज्य माहिती आयोगाने निर्देश देऊनही कारवाई केली नाही म्हणून पालिका आयुक्तांना येत्या १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीआय कार्यकर्ता संतोष कुमार तिवारी याने मार्च २०१४ रोजी पालिकेच्या मालमत्ता कर, अग्निशमन, नगररचना, परवाना व घनकचरा विभागाची माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. मुदतीत माहिती न दिल्याने त्याने राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले होते. आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी २६ मार्च २०१४ रोजी पालिका आयुक्तांना संबंधित अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा अहवाल ३१ मे २०१४ पर्यंत आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तत्कालिन आयुक्त सुरेश काकाणी यांनी आस्थापना विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. परंतु, आस्थापना विभागातील काही अधिकार्यांनी कार्यवाहीच्या आदेशाची प्रतच गहाळ केली. परिणामी माहिती देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने तिवारी यानी २५ जुलै २०१४ रोजी प्रथम अपिल केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ रोजीच्या सुनावणीत पालिकेच्या जनमाहिती अधिकार्यांनी मुदतीत माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले. ................................................................................................वारंवार माहिती मागूनही ती मिळत नसल्याने त्यांनी अखेर कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे अपिल केले. त्यावर २८ ऑगस्ट २०१५ रोजी घेतलेल्या सुनावणीत आयुक्त थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी सध्याचे सहाय्यक आयुक्त हेमंत पाटील व कल्पिता पिंपळे-वडे यांना प्रत्येकी १५ हजार तर अधिकारी दशरथ हंडोरे यांना ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच राज्य माहिती आयोगाने कार्यवाहीचे निर्देश देऊनही ती केल्याने सध्याचे आयुक्त अच्युत हांगे यांना भारतीय दंड संविधान कलम १६६ अन्वये गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, त्याचा खुलासा येत्या १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ....................................................................................................याबाबत पालिका उपायुक्त (मुख्यालय) यांनी सांगितले की, घटनाक्रमानुसार सध्याच्या आयुक्तांना त्याची कल्पना नाही. तसेच सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे-वडे यांना प्रशासनाने अद्यापही जनमाहिती अधिकारीपदाचा कार्यभार सोपविलेला नाही. त्याचा खुलासा कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.