एप्रिल ते जुलैमध्ये ईपीएफमधून काढले ३० हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 04:50 AM2020-07-30T04:50:13+5:302020-07-30T04:50:38+5:30
कोरोनामुळे संकटे; वैद्यकीय खर्च, नोकरकपातीची कुऱ्हाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळामध्ये झालेली नोकरकपात, वेतनकपात तसेच वैद्यकीय खर्चामुळे यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून सुमारे ३० हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम प्रॉव्हिडंट फंडातून याआधी कधीही काढण्यात आली नव्हती.
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन (ईपीएफओ)च्या खात्यातून गेल्या चार महिन्यांत सुमारे ८० लाख लोकांनी प्रॉव्हिटंड फंड रक्कम काढून घेतली आहे. इतकी मोठी रक्कम गेल्यामुळे या संघटनेच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे. ईपीएफओकडे सुमारे १० लाख कोटी रुपयांचा निधी आहे. कोरोना उपचारासाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी ८ हजार कोटी रुपये तर २२ हजार कोटी रुपये अन्य कारणांसाठी काढले.
एक कोटी कर्मचारी पैसे काढतील
देशात जसजशी कोरोना रु ग्णांची संख्या वाढू लागली तसे कर्मचाºयांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्याचे प्रमाणही वाढत होते. येत्या काही दिवसांत या फंडातून रक्कम काढणाºया कर्मचाºयांची संख्या एक कोटी होईल, असा अंदाज ईपीएफओच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.