तरुणाला मारहाण करून ३० हजार लुटले मध्यरात्रीची घटना : तीन महिन्याच्या कष्टाच्या रकमेवर डल्ला
By admin | Published: June 8, 2016 06:35 PM2016-06-08T18:35:06+5:302016-06-08T18:35:06+5:30
जळगाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुणाची रात्री व सकाळीही पोलिसांनी साहेब नसल्याचे कारण सांगत तक्रार घेतली नाही.
Next
ज गाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुणाची रात्री व सकाळीही पोलिसांनी साहेब नसल्याचे कारण सांगत तक्रार घेतली नाही.शुभम हा उरण, नवी मुंबई येथील जेएनपीटी, बोकडविरा येथे नवा शिवा या बंदरावर दहा हजार रुपये महिन्याने कामाला आहे. मुहूणे तेथे कामाला असल्याने चार महिन्यापूर्वीच तो तेथे कामाला लागला. सुरुवातीला एक महिन्यानंतर तो घरी आला होता. आता तीन महिन्यानेच तो घरी आला. तीन महिन्याचा पगार घेऊन तो मंगळवारी रात्री कल्याण येथून पुणे-नागपूर या एक्सप्रेसने जळगावात अडीच वाजता उतरला. स्टेशनच्या बाहेर चहा घेतल्यानंतर शाहू नगर जवळच असल्याने रिक्षा न करता तो पायीच चालत आला. खान्देश कॉम्प्लेक्सजवळ आल्यावर समोर पद्मालय विश्रामगृहाकडे जाणार्या रस्त्याजवळ विरुध्द दिशेने पाच तरुण उभे होते. तो सरळ पुढे गेला, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पुन्हा हेच तरुण सिगारेट ओढताना दिसले. तीन एका दुचाकीवर तर दोन जण दुसर्या दुचाकीवर होते. त्यांच्याकडे लक्ष न देता तो पुढे चालतच गेला. ला क्लासेस्च्या समोर अडविलेयाच परिसरात असलेल्या ला क्लासेस्जवळ तिघांनी त्याला अडविले. त्यापैकी एकाने शंभर रुपये मागितले, त्याने नकार दिला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यापैकी एकाजवळ चॉपर होता, तर दुसर्या दुचाकीवरील दोघांनी त्याची बॅग घेवून पळ काढला. त्या बॅगेत तीन महिन्याच्या पगाराचे तीस हजार रुपये होते.रिंगरोड परिसरात घेतला शोधया घटनेनंतर शुभम हा रिक्षाने घरी पोहचला. चौकात असलेल्या गल्लीतील काही मित्रांना त्याने हा प्रकार सांगितला असता त्यांनी रिंगरोडच्या दिशेने त्या चोरट्यांचा शोध घेतला. त्याच वेळी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याने हा प्रकार सांगितला, त्यांनाही वर्णनावरुन चोरट्यांना शोधले. शेवटी साडे तीन वाजेच्या सुमारास शुभम शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला. शहर पोलिसांनीही त्याला सोबत घेवून घटनास्थळावर आणले. तेथे एका सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असता दोन दिवसापूर्वीही दोन वेळा अशाचा मारहाण व लूटमारीच्या घटना घडल्याचे त्याने सांगितले.