नागपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्द
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30
नागपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्द
Next
न गपूर-इटारसी मार्गावरील ३१ रेल्वेगाड्या रद्दप्रवाशांची गैरसोय : रेल्वे वाहतूक अद्यापही विस्कळीतचनागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे ११ जुलैला १७ आणि १२ जुलैला १४ अशा एकूण ३१ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १७ जूनला इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागली होती. त्यानंतर नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापपर्यंत रुळावर आलेली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू केले आहे. (प्रतिनिधी)............११ जुलैला रद्द केलेल्या रेल्वेगाड्या१७६१० पूर्णा-पटना एक्स्प्रेस२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस११०४५ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस२२३५१ पाटलीपुत्र-यशवंतपूर एक्स्प्रेस१२२९६पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस१२५११ गोरखपुर-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस१२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस५९३८५ इंदोर-छिदवाडा पंचवेली फास्ट पॅसेंजर५९३८६ छिंदवाडा-इंदोर पंचवेली फास्ट पॅसेंजर१४००९ छिंदवाडा-दिल्ली सराय रोहिला पातालकोट एक्स्प्रेस१२६८८ डेहराडून-मदुराई एक्स्प्रेस१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर५१८३० इटारसी-नागपूर एक्स्प्रेस१२ जुलैला रद्द झालेल्या गाड्या१२६४१ कन्याकुमारी-ह. निजामुद्दीन तिरुक्कुरल एक्स्प्रेस१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस१२६५० ह. निजामुद्दीन-यशवंतपूूर कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेस१२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस१२२९६ पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस१२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस२२६७९ यशवंतपूर-श्री माता वैष्णोदेवी कटरा एक्स्प्रेस२२६४६ त्रिवेंद्रम-इंदोर अहिल्यादेवी एक्स्प्रेस२२१११ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस५९३८५ इंदोर-छिदवाडा पंचवेली फास्ट पॅसेंजर५९३८६ छिंदवाडा-इंदोर पंचवेली फास्ट पॅसेंजर५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर५१८३० इटारसी-नागपूर एक्स्प्रेस.................