२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:44 PM2018-03-31T23:44:49+5:302018-03-31T23:44:49+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत. या काळात ३१८ मुले ठार झाली असून, १४४ मुले लष्करांच्या गोळीबारात सापडून तर १४७ मुले अज्ञात बंदूकधाºयांकडून मारली गेली.
जम्मू-काश्मिरात मुलांच्या संरक्षणासाठी कोणतीही कायदेशीर चौकट पाळली जात नाही. तसेच आरोपींविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. काश्मीरचे बांधकाममंत्री नईम अख्तर यांनी सांगितले की, मुलांची हत्या वा गोळीबारात मृत्यू ही राज्यातील मोठी शोकांतिका असून, त्यामुळे येथील जनजीवन, मालमत्ता, शांतता व अर्थव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. (वृत्तसंस्था)
मुलांवरील अन्य गुन्ह्यांचाही उल्लेख
‘जेकेसीसीएस’ने जारी केलेला हा अहवाल ६३ पानांचा आहे. जम्मू-काश्मिरात गेल्या १५ वर्षांत मुलांविरोधातील हिंसाचाराचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यात मुलांची हत्या तसेच मुलांविरोधातील अटक, सामूहिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यासारखे गुन्हे याचा तपशील देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर कोअॅलिशन आॅफ सिव्हिल सोसायटी (जेकेसीसीएस) या मानवी हक्क संघटनेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालातील तपशिलानुसार, लष्करी कारवाईत ठार झालेल्या मुलांपैकी ११० मुलांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.
या अहवालासाठी जेकेसीसीएसच्या संशोधक पथकांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन तसेच वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे खातरजमा करून सलग १५ वर्षे अभ्यास केला आहे.
ही फक्त जम्मू-काश्मीरची मुले नाहीत, ही भारताची
मुले आहेत. त्यांच्याकडे शत्रूची मुले या भावनेने न
पाहता आपली मुले या भावनेने पाहिल्यास प्रवाहच बदलेल.काश्मीरकडे आपण मानवीय दृष्टिकोनातून पाहायला हवे; तरच ही शोकांतिका समजून घेता येईल.