AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:30 PM2022-02-17T19:30:38+5:302022-02-17T19:31:46+5:30
AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. आयसीएमआरचे महानिर्देशक बलराम भार्गव याचं नाव सद्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. सध्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया २३ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर एम्सला नवे संचालक मिळणार आहेत.
एम्सच्या संचालक पदासाठी १२ चिकित्सकांनी अर्ज दाखल केला आहे. यात अस्थिरोग विभाग अध्यक्ष आणि ट्रामा सेंटर प्रमुख राजेश मल्होत्रा, तंत्र विज्ञान केंद्र प्रमुख एम.व्ही.पी. पद्म श्रीवास्तव, एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्रमुख निखील टंडन, सर्जरी विभागाचे प्रमुख सुनील चंबर, कार्डिओथोरेसिस आणि वस्कुलर सर्जरीचे प्राध्यापक ए.के.बिशोई तसंच फोरेन्सिक प्रमुख सुधीर गुप्ता यांच्याही नावांचा समावेश आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, काही नावांची निवड करण्यासाठी चार सदस्यीय संधोधनसह निवड समिती लवकरच बैठक घेणार आहे. याबाबत निर्णय घेणं अद्याप बाकी आहे. समितीचे सदस्य केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, जैव प्राद्योगिकी विभागाचे सचिव राजेश गोखले, सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन आणि दिल्ली विश्वविद्यालयाचे कुलगुरू योगेश सिंह यांचा समावेश आहे.
२९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाली होती जाहीरात
"समितीचे सदस्य काही नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी लवकरच एक बैठक करणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळानं नियुक्त केलेल्या समितीकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे", असं एका सुत्रांनी सांगितलं आहे. एम्सच्या नव्या संचालक पदासाठीची जाहिरात २८ नोव्हेंबर रोजीच देण्यात आली होती आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २९ डिसेंबर २०२१ पर्यंत होती.