कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी
By admin | Published: November 8, 2016 04:01 PM2016-11-08T16:01:40+5:302016-11-08T16:01:40+5:30
कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले, तर एका मुलाचा मृत्यू झाला
Next
कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी
ऑनलाइन लोकमत
किशान्सा, दि. 8 - कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले, तर एका मुलाचा मृत्यू झाला. देशाच्या पूर्व भागातील गोमा शहरात हा बॉम्बस्फोट झाला. संयुक्त राष्ट्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
कांगोत तैनात असलेले भारतीय शांती सैनिक मंगळवारी सकाळी गोमा शहरात मॉर्निंग रनसाठी जात असताना हा स्फोट झाला. कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे 18 हजार शांती सैनिक तैनात आहेत. या शांतीसैनिकांमध्ये भारतीय जवानांचा समावेश आहे.
32 Indian solders injured in roadside blast on the outskirts of Goma in Congo, who were moving for administrative duty: Army sources
— ANI (@ANI_news) 8 November 2016