३२१ कोटींचा नवा घोटाळा, नीरव मोदीवर दुसरा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:09 AM2018-03-09T05:09:58+5:302018-03-09T05:09:58+5:30

पंजाब नॅशनल बँकेस आणखी ३२१ कोटी रुपयांना गंडा घातल्याबद्दल फरार हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद २०१३ ते २०१७ या काळातील कर्जव्यवहारांची आहे. दरम्यान, नीरव मोदी व मेहूल चोकसी यांनी...

 321 crore new scam, second offense to Neervai Modi | ३२१ कोटींचा नवा घोटाळा, नीरव मोदीवर दुसरा गुन्हा

३२१ कोटींचा नवा घोटाळा, नीरव मोदीवर दुसरा गुन्हा

Next

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेस आणखी ३२१ कोटी रुपयांना गंडा घातल्याबद्दल फरार हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद २०१३ ते २०१७ या काळातील कर्जव्यवहारांची आहे. दरम्यान, नीरव मोदी व मेहूल चोकसी यांनी केलेल्या गैरव्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे बँकेने म्हटल्याचे कळते.
नव्या घोटाळ्यात मोदीखेरीज फायरस्टार डायमंड््स इंटरनॅशनल कंपनीचा माजी वित्त संचालक विपुल अंबानी, मुख्य वित्तीय अधिकारी रवि गुप्ता, कंपनीचे अन्य संचालक, अधिकारी, बँकेतील कर्मचाºयांना आरोपी केले आहे. सोलर एक्सपोर्ट््स, स्टेलर डायमंड््स व डायमंड आर यूज या मोदीच्या भागीदारी फर्म व फायरस्टार समूह यांच्यात मोठ्या रकमांच्या फिरवा फिरवीचे व्यवहार झाल्याचे चौकशीत दिसून आले. फायरस्टार डायमंड्स व फायरस्टार इंटरनॅशनल यांची खाती बँकेने बोगस ठरविली असून, रिझर्व्ह बँकेसही तसे कळविले आहे.
याआधी १४ व २६ फेब्रुवारी रोजी बँकेने केलेल्या अनुक्रमे १२,६०० कोटी व १,३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारींवरून पहिला गुन्हा नोंदला गेला आहे. याखेरीज सीबीआयने मेहूल चोकसी याच्या गीतांजली कंपनी समूहाविरुद्ध ४,८८६ कोटी रुपयांच्या घोटाळ््याचा स्वतंत्र गुन्हा १५ फेबु्रवारी रोजी नोंदविला आहे.

चोकसीचाही नकार
मेहूल चोकसी याने सीबीआयला पत्र लिहून आजारपण व कामाचा व्याप यामुळे आपण परत येऊ शकत नाही. आपला पासपोर्टही रद्द केला असल्याचे कळविले आहे. मोदीप्रमाणे चोकसीनेही सीबीआयने आपले भारतातील व्यवसाय बंद करून, बँक खाती गोठवून व संपत्तीवर टाच आणून आपले नुकसान केल्याची ओरडही त्याने केली आहे.

Web Title:  321 crore new scam, second offense to Neervai Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.