गोकाकमध्ये ३४ लाखाच्या बनावट नोटा जप्त, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:58 PM2024-07-03T15:58:46+5:302024-07-03T16:00:07+5:30

बेळगाव : गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध ...

34 lakh fake notes seized in Gokak Belagavi district of Karnataka state, six arrested | गोकाकमध्ये ३४ लाखाच्या बनावट नोटा जप्त, सहा जणांना अटक

गोकाकमध्ये ३४ लाखाच्या बनावट नोटा जप्त, सहा जणांना अटक

बेळगाव : गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बनावट नोटा बनवून त्या चलनात आणून दुप्पट करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन बेकायदेशीर कारवाईप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी सांगितले.

मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. गोकाक-बेळगाव मार्गावरील कडबगट्टीतून जात असलेली कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली, यादरम्यान हा प्रकार उघड झाला. कारमधून बनावट नोटांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत १०० रुपयांच्या ३०५ आणि ५०० रुपयांच्या ६,७९२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या कारवाईत अरभावीमधील अनवर महंमद सलीम यादवाड (वय २६), महालिंगपूर येथील सद्दाम मुसा यडहळ्ळी (२७), डुंडाप्पा महादेव ओनशेवी (२७), रवी चन्नाप्पा ह्यागाडी (२७), विठ्ठल हणमंत होसकोटी (२९) मल्लप्पा यल्लाप्पा कुंबाळी (२९) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान गोकाक, महालिंगपूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल धरण, बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरण केल्याची कबुली दिली आहे. 

चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अरभावी गावातील अन्वर यादव याच्या घरातून बनावट कागदपत्रे, संगणक, प्रिंटर आणि मोबाइल फोन आदी उपकरणे जप्त केली आहेत. उघड झालेल्या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या प्रकरणाच्या खोलवर तपासासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 34 lakh fake notes seized in Gokak Belagavi district of Karnataka state, six arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.