बिहारमध्ये सुधारगृह फोडले, खुनी, बलात्काऱ्यांसह ३४ कैदी पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 04:18 PM2017-09-25T16:18:04+5:302017-09-25T16:23:56+5:30
बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले.
पाटणा, दि. २५ - बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये सुधारगृह फोडून ३४ कैदी पसार झाले. ही घटना रविवारी घडली. पसार झालेल्या कैद्यांमध्ये बलात्कारी, खुनी आणि अल्पवयीन कैद्यांचा समावेश आहे. मात्र फरार झालेल्या कैद्यांपैकी १२ कैदी काही वेळाने परत सुधारगृहात हजर झाले.
मुंगेरचे पोलीस प्रमुख आशीष भारतीने सांगितले की, कैद्यांनी लोखंडाची ग्रील आणि दरवाजे तोडले आणि रात्री पसार झाले. फरार झालेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांविरोधात खून, बलात्कार आणि चोरीसारख्या गुन्हात सुनावणी चालू आहे." आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच फरार कैद्यांचा शोध सुरू आहे. या सुधारगृहात एकूण ८६ कैदी होते. अधिकृत आकडेवारीनुसार १८ वर्षांहून कमी वयाचे सुमारे ३१ हजार अल्पवयीन कैदी विविध सुधारगृहांमध्ये आहेत. अशा प्रकारच्या सुधारगृहांमध्ये कुणीही सुरक्षारक्षक नसतो. याआधी २०१५ साली बिहारमध्ये सुधारगृहामधून १०० कैदी पसार झाले होते.