धक्कादायक! 2017 मध्ये लग्नासाठी 3,400 नवरदेवांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:29 PM2018-02-05T13:29:12+5:302018-02-05T13:31:27+5:30

जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे.

3,400 grooms abducted for ‘pakadua vivah’ in 2017 | धक्कादायक! 2017 मध्ये लग्नासाठी 3,400 नवरदेवांचे अपहरण

धक्कादायक! 2017 मध्ये लग्नासाठी 3,400 नवरदेवांचे अपहरण

Next

पाटणा - लग्नासाठी मुलगी तयार होत नसेल तर मुल मुलीला पळवून आणतात. पण बिहारमध्ये बिलकुल याउलट घडलं आहे. बिहारमध्ये जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी एका वर्षात तब्बल 3,400 युवकांच अपहरण करण्यात आलं. 2017 या वर्षातील ही अधिकृत आकडेवारी आहे. अशा प्रकारच्या लग्नाला बिहारमध्ये पाकदुआ विवाह म्हटले जाते. जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी 3405 युवकांचे अपहरण करण्यात आले. 

बंदुकीच्या धाकावर किंवा धमकी देऊन हे विवाह लावण्यात आले अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली. मागच्या महिन्यात पाटण्यामध्ये बंदुकीच्या धाकावर एका इंजिनिअरचे अपहरण करुन त्याचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. त्या घटनेला राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे प्रसिद्धी मिळाली होती. 

2016 मध्ये पाकदुआ विवाहासाठी 3070, 2015 मध्ये तीन हजार आणि 2014 मध्ये 2,526 युवकांचे अपहरण करण्यात आले. या विवाहांमध्ये युवक आणि त्याच्या कुटुंबियांना धाक दाखवून लग्नाला भाग पाडण्यात आले अशी माहिती पोलीस  अधिका-याने दिली.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बिहारमध्ये दरदिवशी नऊ विवाह जबरदस्तीने लावले जातात. 
 

काय घडलं विनोद कुमारच्या बाबतीत

बंदुकीच्या धाकावर 29 वर्षीय इंजिनिअर विनोद कुमारचे अपहरण करुन त्याला लग्नासाठी थेट विवाहाच्या मांडवात आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथील पांडाराक भागात ही धक्कादायक घटना घडली. विनोद कुमार असे पीडित इंजिनिअरचे नाव असून तो बोकारो स्टील प्लांटमध्ये ज्यूनियर इंजिनिअर पदावर नोकरीला आहे. 

अपहरण केल्यानंतर विनोद कुमारला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने विवाहासाठी मांडवात बसवण्यात आले. ही जबरदस्ती सुरु असताना विनोद कुमार अक्षरक्ष: रडून मदतीसाठी याचना करत होता. पण मुलीकडच्या बाजूच्या महिला लग्नाच्या विधीमध्ये त्याने सहकार्य करावे यासाठी विनोद कुमारची समजूत घालत होत्या.  एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये आपली वधूपक्षाकडच्या एका नातेवाईकाबरोबर ओळख झाली तिथे त्या नातेवाईकाने आपल्या डोक्याला बंदुक लावली व लग्नाला भाग पाडले असा आरोप विनोद कुमारने केला.
 

Web Title: 3,400 grooms abducted for ‘pakadua vivah’ in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.