३४४ औषधांवर केंद्राची बंदी
By admin | Published: March 15, 2016 02:36 AM2016-03-15T02:36:11+5:302016-03-15T02:36:11+5:30
दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचे निश्चित मिश्रण असलेल्या किमान ३४४ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये कफ
नवी दिल्ली : दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचे निश्चित मिश्रण असलेल्या किमान ३४४ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये कफ सिरपच्या मिश्रणाचाही समावेश आहे. मनुष्यमात्राने अशा प्रकारच्या औषधांचा वापर करण्यात ‘जोखीम’ आहे आणि या औषधांचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या ३४ औषधांवरील बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे आणि मंत्रालयाने या संदर्भात राजपत्रात एक अधिसूचनाही जारी केली आहे. ‘३४४ पेक्षा जास्त औषध कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. विशेषज्ञ समितीने आपल्या शिफारशी सादर केल्यानंतर या कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती; परंतु काही कंपन्यांनी नोटिशीला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. प्रत्येकाला उचित संधी दिली गेली आणि त्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले,’ असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)