मागील 3 वर्षात पोलिस कस्टडीमध्ये 348 जणंचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:43 PM2021-08-04T16:43:03+5:302021-08-04T16:43:27+5:30

Parliament mansoon session: केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

348 people have died in police custody in the last 3 years, central govt said in Lok Sabha | मागील 3 वर्षात पोलिस कस्टडीमध्ये 348 जणंचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

मागील 3 वर्षात पोलिस कस्टडीमध्ये 348 जणंचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

Next
ठळक मुद्देतमिळनाडुत पोलिस कस्टडीत झालेल्या बाप-लेकाच्या मृत्यूची देशभर चर्चा

नवी दिल्ली: पोलिस कस्टडी किंवा तुरुंगात अनेकदा कैद्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडतात. पोलिसांच्या या जाचक कारवायांविरोधात अनेकदा आवाजही उठवला जातो. आता याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, मागील तीन वर्षात तुरुंगात 348 कैद्यांचा मृत्यू झालाय, तर 1189 जणांना मारहाण झाली आहे.    

लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कस्टडीमध्ये 2018 मध्ये 136, 2019 मध्ये 112 आणि 2020 मध्ये 100 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, 2018 मध्ये 542, 2019 मध्ये 411 आणि 2020 मध्ये 236 जणांवर जाचक अत्याचार करण्यात आले.

तमिळनाडुतील घटनेची देशभर चर्चा
मागच्या वर्षी कोरोना लॉकडाउनदरम्यान तमिळनाडुमध्ये झालेल्या एका घटनेची देशभर चर्चा झाली होती. तमिळनाडुत पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे फेनिक्स यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यांनी लॉकटाउन काळात आपली मोबाइलचे दुकान चालु ठेवल्यामुळे पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.

Web Title: 348 people have died in police custody in the last 3 years, central govt said in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.