Himachal Pradesh Weather: हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:45 AM2018-09-25T08:45:49+5:302018-09-25T08:54:50+5:30
Himachal Pradesh Rains Update: हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.
शिमला- हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यातच अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच जास्त उंचीच्या ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. बेपत्ता असलेला एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांनी सांगितलं की, सर्व जण हम्पता येथे ट्रेकिंगला गेले होते. त्यांना मनालीत परतायचं होतं. परंतु त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.
Himachal Pradesh: 45 ppl including 35 IIT Roorkee students are missing in Lahul Spiti. Rajvir Singh, father of one of the students Ankit Bhati, said that they had gone for trekking to Hamta trekking pass in Kullu & were supposed to return to Manali, but now they've lost contact
— ANI (@ANI) September 24, 2018
लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात 8 जणांचा एक ग्रुप ट्रेकिंगसाठी गेले होते. यात ब्रुनेईची एक महिला संजिता तुबा, नेदरलँडचे एबी लिम आणि 6 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या ग्रुपमधील प्रियंका वोरा, पायल देसाई, दीपिका, दिव्या अग्रवाल, अभिनव चंदेल आणि अशोक बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशमधल्या मुसळधार पावसाचा कहर पाहता कांगडा जिल्ह्यातील व्यास नदीवर असलेल्या पोंग धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात. कारण नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. बीबीएमबीच्या अधिका-याच्या माहितीनुसार, व्यास नदीवरील धरणाचे दरवाजे कधीही उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Himachal Pradesh: A group of 8 people, comprising a woman from Brunei Sanjida Tuba, a man from The Netherlands Abby Lim&6 Indian nationals Priyanka Vora, Payal Desai, Dipika, Divya Aggarwal, Abhinav Chandel&Ashok have gone missing from Lahaul-Spiti where they were going on a trip
— ANI (@ANI) September 24, 2018
हिमाचल, पंजाब, काश्मिरात मुसळधार पाऊस
हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार पावसाने आलेल्या नद्यांना आलेल्या पुरात एक इसमाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी बस, ट्रकसह अनेक वाहनेही पुरात वाहून गेली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही पुरात वाहून गेली आहेत. पावसाचा जोर असतानाच रोहतांग पाससह अनेक भागांत आताच बर्फवृष्टी सुरू झाली आहे. कुल्लू जिल्ह्यात रविवारी डोबी येथे अचानक आलेल्या पुरानंतर हवाई दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. राज्याच्या ८ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कांगडा, चंबा, मंडी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. डोंगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चंबा जिल्ह्यात २४ तासात १८० मिमी पाऊस झाला. काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी २९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या.
Himachal Pradesh: Snow clearing operations were started earlier today by the district administration on the Highway from Kaza to Gramphu in Lahaul-Spiti district. pic.twitter.com/xUi06wCTVl
— ANI (@ANI) September 24, 2018