मक्केतील चेंगराचेंगरीत ३५ भारतीयांचा मृत्यू

By Admin | Published: September 28, 2015 02:29 AM2015-09-28T02:29:05+5:302015-09-28T02:29:15+5:30

गत आठवड्यात मुस्लिमांच्या सर्वात पवित्र अशा हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या वाढून ३५ झाली आहे

35 Indians die in maize stampede | मक्केतील चेंगराचेंगरीत ३५ भारतीयांचा मृत्यू

मक्केतील चेंगराचेंगरीत ३५ भारतीयांचा मृत्यू

googlenewsNext

मिना (सौदी अरब): गत आठवड्यात मुस्लिमांच्या सर्वात पवित्र अशा हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या वाढून ३५ झाली आहे. सौदी अरबमध्ये गत २५ वर्षांतील हज यात्रेदरम्यानची ही सर्वात मोठी दुर्घटना होती.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. दुर्दैवाने आणखी १३ मृतदेह भारतीयांचे असल्याची ओळख पटल्यानंतर या दुर्घटनेत मुत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या ३५ झाली आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले. मृतांमध्ये झारखंडचे मंसूरूल हुक, उत्तर प्रदेशचे अनवर आणि केरळचे एफ ए मुनीर वीतिल, अमीना बीवी, अब्दुल रहमान असरितहोदी, पी व्ही कुनहिमोन व मोईनुद्दीन अब्दुल कादिर , बिहारचे जासबुन निशा, झारखंडच्या नशिमा खातून, गुजरातचे मोहम्मद युनूस रहीमभाई मनसूरी, बीबी इस्माईल, मेहरूनिशा हनीफ, मुहम्मद युसूफ सिकंदरमियां मलीक यांचा समावेश आहे.
दरम्यान सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांची एकूण संख्या ७६९ वर पोहोचली असून जखमींचा आकडा ९३४ झाला आहे. जखमींमध्ये किमान १३ भारतीयांचा समावेश आहे. शाह सलमान यांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्याचा आदेश दिला आहे. हज यात्रेत १८० देशांच्या २० लाखांवर यात्रेकरूंनी भाग घेतला होता. यात भारतातून सुमारे दीड लाख भाविक गेले होते. गत ११ सप्टेंबरला मक्का येथील सर्वांत मोठ्या मशिदीत अवजड क्रेन कोसळल्याने ११ भारतीयांसह ११५ लोक ठार झाले होते. ही दुर्घटना ताजी असतानाच गत २४ सप्टेंबरला मिनात सैतानाला खडे मारण्याच्या विधीदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती.(वृत्तसंस्था)

Web Title: 35 Indians die in maize stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.