शिर्डीतील तोडफोडप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा साईभक्तांना मारहाण : आक्रोश मोर्चातील कार्यकर्त्यांवर कारवाई
By Admin | Published: July 3, 2015 11:00 PM2015-07-03T23:00:07+5:302015-07-03T23:00:07+5:30
>शिर्डी : शिर्डीत गुरुवारी निघालेल्या आक्रोश मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी साईभक्तांना मारहाण करत हॉटेल व दुकानांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संयोजकांसह ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोणासही अटक झालेली नव्हती़ नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विविध दलित संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. काही आंदोलकांनी साईभक्तांना मारहाण केली तसेच हॉटेल, दुकानांमध्ये तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ कैलास कोते, अभय शेळके आदींच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी प्रतिमोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना निवेदन देऊन साईभक्तांना मारहाण करणार्यांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)-----------विखेंकडून पाहणी शुक्रवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ तोडफोडप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली़--------मुख्यमंत्र्यांवर टीकाविमान थांबवून सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून त्यांनी बिनशर्त माफी मागायला हवी, असे विखे म्हणाले. राज्याच्या प्रमुखाकडून विमान थांबवून सामान्यांना वेठीस धरणे अपेक्षित नव्हते़ माफीऐवजी अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा देणे, मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही, असेही ते म्हणाले.