कृषी क्षेत्र व शेतक-यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटी रुपये - जेटली

By admin | Published: February 29, 2016 11:31 AM2016-02-29T11:31:22+5:302016-02-29T15:44:25+5:30

कृषी क्षेत्र आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली

35,984 crore for the welfare of agriculture sector and farmers - Jaitley | कृषी क्षेत्र व शेतक-यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटी रुपये - जेटली

कृषी क्षेत्र व शेतक-यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटी रुपये - जेटली

Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - कृषी क्षेत्र आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. बजेट 2016 सादर करताना जेटली म्हणाले की निव्वळ सिंचनासाठी नाबार्ड अंतर्गत 20 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. 
- पिक विमा योजनेसाठी 5 हजार कोटी रुपये.
- कृषी विज्ञान केंद्रासाठी 50 लाख रुपये.
- डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 हजार कोटी रुपये.
- शेतक-यांसाठी पाच लाख विहिरी व तलाव खोदणार.
- बी बियाणे तपासण्यासाठी देशभरात 2000 प्रयोगशाळा उभारणार.
- 28.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार.
- येत्या एका वर्षात सिंचनावर 17 हजार कोटी रुपये खर्च करणार.
- सध्या 46 टक्के शेती सिंचनाखाली असून ती वाढवण्याचा प्रयत्न
- शेतक-यांसाठी 9 लाख कोटींचे कर्ज
- शेतकरी देशाच्या अन्न सुरक्षेचा कणा.
 

Web Title: 35,984 crore for the welfare of agriculture sector and farmers - Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.