३६ राफेल विमानांची खरेदी हवाई दलाच्या हिताची - पर्रीकर

By admin | Published: April 12, 2015 01:52 AM2015-04-12T01:52:28+5:302015-04-12T01:52:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३६ राफेल विमान खरेदीसाठी फ्रान्स सरकारशी केलेला करार हा भारतीय हवाई दलाच्या व पर्यायाने देशाच्या हिताचा आहे.

36 Airfight for the purchase of Rafael aircraft - Parrikar | ३६ राफेल विमानांची खरेदी हवाई दलाच्या हिताची - पर्रीकर

३६ राफेल विमानांची खरेदी हवाई दलाच्या हिताची - पर्रीकर

Next

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३६ राफेल विमान खरेदीसाठी फ्रान्स सरकारशी केलेला करार हा भारतीय हवाई दलाच्या व पर्यायाने देशाच्या हिताचा आहे. आपण त्या कराराचे स्वागत करतो, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पर्रीकर म्हणाले, भारतीय हवाई दलाची केवळ ९७ विमाने उत्तम स्थितीत आहेत. अन्य विमानांची सातत्याने दुरुस्ती करावी लागते. तातडीने हवाई दलाच्या ताफ्यात ३६ विमाने येणे गरजेचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी फ्रान्सशी केलेला करार मोठे सकारात्मक पाऊल आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रयोग भविष्यात राबविता येईल.
पर्रीकर यांनी सांगितले, की गेली सतरा वर्षे विमान खरेदी झालेली नाही. १७ वर्षांनंतर भारताने करार केला आहे. या विमानांमुळे हवाई दलाला किमान प्राणवायू मिळू शकेल. (खास प्रतिनिधी)

चीनच्या सीमेवर रेल्वे
भारत-चीन सीमेवर व विशेषत: अरुणाचल प्रदेशमध्ये आता पूर्वीप्रमाणे तीव्र स्वरूपाचा वाद राहिलेला नाही, असे पर्रीकर यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले. सीमेविषयी वाद निश्चितच आहे; पण त्यासाठी गोळीबार केला जात नाही. जो भाग भारत आपला आहे असे म्हणतो, त्या भागावर चीन
दावा करते. त्यातून संघर्ष होतो; परंतु हा खूप जुना प्रश्न आहे, असे पर्रीकर म्हणाले.

Web Title: 36 Airfight for the purchase of Rafael aircraft - Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.