२४ तासांत ३६ अंडी
By admin | Published: June 13, 2017 01:55 AM2017-06-13T01:55:44+5:302017-06-13T01:55:44+5:30
सामान्यपणे एक कोंबडी दिवसातून दोन किंवा फार फार तर तीन अंडी देते. मात्र, जयपूरच्या घाटगेट भागातील कोंबडीने कमालच केली. तिने एका दिवसात दोन-चार
जयपूर : सामान्यपणे एक कोंबडी दिवसातून दोन किंवा फार फार तर तीन अंडी देते. मात्र, जयपूरच्या घाटगेट भागातील कोंबडीने कमालच केली. तिने एका दिवसात दोन-चार नाही तर तब्बल ३६ अंडी दिली. ही कोंबडी आपण बाजारातून विकत घेतली होती. तिने एका दिवसात ३६ अंडी दिली, असा दावा रईस खान यांनी केला. ते घाटगेटच्या तोफखाना हुजुरी छोटा पार्क येथे राहतात. या अनोख्या घटनेची माहिती पंचक्रोशीत पसरल्यानंतर या कोंबडीला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडू लागली आहे.
ही अनोखी कोंबडी पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. रमजानच्या महिन्यात ईश्वराने केलेली ही किमया असल्याचे रईस आणि इतर लोक मानतात. ‘आपण खाण्यासाठी ही कोंबडी बाजारातून खरेदी केली होती. तिला घरी ठेवून मी काही कामानिमित्त बाहेर गेलो. सायंकाळी मी जेव्हा घरी परतलो तेव्हा कोंबडीचा प्रताप पाहून माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. तिने १२ तासांत १६ अंडी दिली.
एक दिवस उलटल्यानंतर (२४ तास) या कोंबडीने ३६ अंडी दिल्याचे पाहून रईस आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. ही गोष्ट सर्वांना अचंबित करणारी आहे. कारण सामान्यपणे एक कोंबडी दिवसाला दोन किंवा फार फार तर तीन अंडी देते. सध्या ही कोंबडी सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे, हे निश्चित.