डोनाल्ड ट्रम्प यांचे 36 तास, नरेंद्र मोदी पास की नापास?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:19 PM2020-02-27T12:19:56+5:302020-02-27T12:22:34+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांची सहकुटुंब भारत भेटीमुळे देशाला काय मिळालं?
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत भेटीचा जगभर चर्चा झाली. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ट्रम्प हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले होते. एकीकडे, अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याची टीका करण्यात आली. तर दुसरीकडे भारत-अमेरिका संबंध दृढ होणारी ही कौटुंबिक भेट असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाच्या नकाशावर भारताचा महत्व वाढविल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र, ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत भेटीतून भारताला नेमकं काय मिळालं? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची सहकुटुंब भारत भेटीमुळे देशाला काय मिळालं? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ट्रम्प दौऱ्यातील परीक्षेत नरेंद्र मोदी पास झाले की नापास? हाही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, ट्रम्प यांचा दोन दिवसीय दौरा आटोपताच व्हाईट हाऊसने 'ट्रम्प इज स्ट्रेंथनिंग अवर स्ट्रॅटिजी विद इंडिया' या मथळ्याने एक वार्तांकन प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांना मजबूत आर्थिक संबंधातून फायदाच होईल. त्यामुळे दोन्ही देशांत रोजगार, गंतवणूक होऊन विकास साधला जाईल, असे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा प्रमुख उद्देश हा भारत आणि अमेरिकेतील व्यवहारिक संबंध प्रस्थापित करणे हा होता. यापूर्वीही दोन्ही देशांमध्ये चांगले व्यापारी संबंध राहिले आहेत. त्यामुळे 2018 मध्ये दोन्ही देशातील व्यापार हा 148 अब्ज डॉलर एवढा होता. अमेरिकी ऊर्जा निर्यात करण्यासाठी भारत ही चांगली बाजारपेठ आहे. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत ऊर्जा निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे अमेरिकेनं म्हटलं आहे. दोन्ही देशांकडून आपले सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्यात येत असून व्यापारी संबंध वाढीस लागण्याची दिशा ठरविण्यात येत आहे.
व्हाईट हाऊस जाण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये अनेक करार
अमेरिकेकडून भारताला 24 एमएच.. 60 रोमियो हॅलिकॉप्टरचे 2.6 अब्ज अमेरिकन डॉलरची खरेदी होणार आहे. तसेच, 80 कोटी डॉलरचा आणखी एक व्यवहार होणार असून 6 एच.. 64 ई अपाच्या हॅलिकॉप्टरसंदर्भात आहे.
5 जी दूरसंचार यंत्रणेसाठीही दोन्ही देशांनी पुढाकार घेण्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पण, केवळ उत्तेजना आणि सेन्सरशीपच्या जाळ्यात 5जी सेवा अडकता कामा नये, असे म्हणत ट्रम्प यांनी चीनला टोला लगावत हुवई कंपनीचा अनुल्लेखाने मारले.
ट्रम्प यांनी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चतुष्कोणाचाही उल्लेख केला आहे. हिंदी महासागरातील चीनच्या अतातायी भूमिकेनंतर हिंद प्रशांत क्षेत्रातील शांतीसाठी बनविण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना पाठिशी न घालण्याचे सुनावले आहे. त्यानंतर, पाकिस्ताननेही पठाणकोट आणि 26/11 हल्ल्यातील दोषी संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय.
आयटी क्षेत्रातील भारतीय व्यवसायिकांसाठी एच1 बी वीजा देण्याचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला होता.
दिल्ली हिंसाचार, काश्मीर आणि नागरिकता संशोधन कानून या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली नसून भारत सरकारनेच हा मुद्दा सोडवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
विशेष म्हणजे भारत दौऱ्यातून अमेरिकेत गेल्यानंतर लवकरच भारतात आणखी एक दौरा होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत.