राज्यातील ३६ खासदारांची मराठीतून शपथ; शपथ घेताना घडले मजेदार किस्से, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 09:13 AM2024-06-26T09:13:28+5:302024-06-26T09:13:39+5:30
९ जणांनी हिंदीत, तर तिघांनी घेतली इंग्रजीत शपथ; शपथ घेताना घडले मजेदार किस्से; आज होणार घमासान?
नवी दिल्ली: लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खामदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. राज्यातील ४८. खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत सपथ घेतली.
बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेताच हंगामी अध्यक्षांनी रोखले
उद्धवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे' असा उल्लेख केला. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी 'ऐका... तसे करू नका. तुमच्यापुढे जे (प्रतिज्ञापत्र) (प्रतिज्ञापत्र) ठेपले ठेवले आहे, ते मराठीत आहे. तेवढेच वाचा, असे निर्देश दिले. त्यानंतर आष्टीकर यांनी लोकसभा सचिवालयाने व्यासपीठावर ठेवलेले प्रतिज्ञापत्र वाचून दाखवत शपथ घेतली.
नीलेश लंकेंची थेट इंग्रजीतून शपथ
सोमवारी २६२ खासदारांनी पहिल्या दिवशी सदस्यत्त्वाची शपथ घेतली. त्यानंतर मंगळवारी उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला. नव्या लोकसभेचे चित्र बरेचसे बदलल्यानंतर उत्साहाच्या वातावरणात शपथविधी पार पडला. त्यात शरद पवार गटातील अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन लक्ष वेधून घेतले. नीलेश लंके यांनी इंग्रजीतून सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी असा शेवट केला. प्रचारात सुजय विखे यांनी लंकेंना त्यांच्यासारखे इंग्रजी बोलून दाखवल्यास निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे उघड उघड आव्हान दिले होते. त्यातूनच त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्याची चर्चा होत आहे.
नेमकी कुणी घेतली कोणत्या भाषेत शपथ?
काँग्रेस
छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर - मराठी
शोभा बच्छाव, धुळे - मराठी
बळवंत वानखेडे, अमरावती - मराठी
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर - मराठी
कल्याण काळे, जालना - मराठी
वसंत चव्हाण, नांदेड - मराठी
वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य - मराठी
शिवाजी कालगे, लातूर - मराठी
प्रणिती शिंदे, सोलापूर - हिंदी
गोवाल पाडवी, नंदूरबार - हिंदी
श्यामकुमार बर्वे, रामटेक - हिंदी
डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा-गोंदिया - हिंदी
नामदेव किरसान, गडचिरोली-चिमूर - इंग्रजी
भाजप
छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा - मराठी
मुरलीधर मोहोळ, पुणे - मराठी
रक्षा खडसे, रावेर - मराठी
स्मिता वाघ, जळगाव - मराठी
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - हिंदी
अनुप धोत्रे, अकोला - हिंदी
पीयूष गोयल, उत्तर मुंबई - हिंदी
नितीन गडकरी, नागपूर - हिंदी
हेमंत सावरा, पालघर - इंग्रजी
उद्धवसेना
संजय देशमुख, यवतमाळ वाशिम - मराठी
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली - मराठी
संजय जाधव, परभणी - मराठी
राजाभाऊ वाजे, नाशिक - मराठी
संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई - मराठी
अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई - मराठी
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई - मराठी
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी - मराठी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव - मराठी
शरद पवार गट
अमर काळे, वर्धा- मराठी
भास्कर भगरे, दिंडोरी - मराठी
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी - मराठी
बजरंग सोनावणे, बीड - मराठी
सुप्रिया सुळे, बारामती - मराठी
अमोल कोल्हे, शिरूर - मराठी
ध्यैर्यशील मोहिते पाटील, म्हाडा - मराठी
नीलेश लंके, अहमदनगर - इंग्रजी
शिंदेसेना
प्रतापराव जाधव, बुलढाणा - मराठी
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर - मराठी
श्रीकांत शिंदे, कल्याण - मराठी
नरेश म्हस्के, ठाणे - मराठी
रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम - मराठी
श्रीरंग बारणे, मावळ - मराठी
धैर्यशील माने, हातकणंगले- मराठी
अजित पवार गट
सुनील तटकरे, रायगड - मराठी
अपक्ष
विशाल पाटील, सांगली - हिंदी