एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले...; पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये तरुणांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 12:23 PM2022-10-30T12:23:56+5:302022-10-30T12:31:04+5:30

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी षष्ठी मातेकडून आशीर्वाद मागितले.

36 satellites launched simultaneously Pm narendra modi praised youth in Man Ki Baat | एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले...; पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये तरुणांचे केले कौतुक

एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले...; पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये तरुणांचे केले कौतुक

Next

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी षष्ठी मातेकडून आशीर्वाद मागितले. सौरऊर्जेमुळे जनतेला काय फायदा होत आहे, यावर त्यांनी चर्चा केली. तेथील लाभार्थ्यांशीही चर्चा केली. 

यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत चंदीगड विमानतळाचे नाव भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली. २०१४ पासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संबोधित करतात.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी शाळकरी मुलांसोबत धावले; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उडाला गोंधळ

उद्या म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. सरदार पटेल यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्या, ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस आहे, जो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा एक पुण्यपूर्ण प्रसंग आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात RunForUnity चे आयोजन केले जाते. ही शर्यत देशातील एकतेचा धागा मजबूत करते, तरुणांना प्रेरणा देते, असंही मोदी म्हणाले. 

"अनेकवेळा आपण पाहतो की जेव्हा विद्यार्थी शक्तीचा विचार केला जातो तेव्हा त्याची व्याप्ती विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांशी जोडून कमी केली जाते. पण विद्यार्थी शक्तीची व्याप्ती खूप मोठी आहे, विद्यार्थी शक्ती हा भारताला सशक्त बनवण्याचा आधार आहे. असंही मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या शक्तिशाली रॉकेटवरही चर्चा केली. "भारताने एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या तरुणांकडून देशाला दिवाळीची खास भेट होती. पूर्वी भारतातील अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणेच्या कक्षेत मर्यादित होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातील तरुणांसाठी, भारताच्या खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले, तेव्हा त्यात क्रांतिकारी बदल होऊ लागले आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सौरऊर्जेवर बोलताना मोदींनी गुजरातमधील सूर्या गाव मोढेराविषयी चर्चा केली. मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील देशातील पहिल्या सूर्य ग्राम - मोढेराबद्दल बरीच चर्चा ऐकली असेल. मोढेरा सूर्या गावातील बहुतांश घरांमध्ये सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. आता अनेक घरांना महिनाअखेर वीज बिल येत नाही, उलट विजेच्या कमाईचे पैसे मिळत आहेत.
 

Web Title: 36 satellites launched simultaneously Pm narendra modi praised youth in Man Ki Baat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.