३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:50 AM2023-12-23T05:50:22+5:302023-12-23T05:50:30+5:30

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.

36 soldiers martyred in three years; Rajairi, Poonch area became a new base | ३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

- सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्याला आपला नवा तळ बनवला आहे. सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी आणखी पाच जवानांची हत्या केली. या भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत शहीद झालेल्या जवानांची संख्या ३६च्या वर पोहोचली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी १२ नागरिकांचीही हत्या केली. 

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. या वर्षी २२ नोव्हेंबर आणि आता २१ डिसेंबरला अवघ्या महिनाभरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या वर्षी ६ मे रोजी तब्बल १० महिन्यांनी दहशतवाद्यांनी दरहालमध्ये जवानांवर हल्ला केला हाेता.  त्यात पाच जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने अद्याप पकडलेले नाही. 

दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनची मदत
nलष्करी जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने लष्करी हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच लष्करातील श्वान पथकांची मदत घेण्यात आली आहे. 
nया मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजौरी, पुंछ भागात घातपाती कारवाया करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.
nत्यांची संख्या ७ ते १० आहे. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दोन लष्करी वाहनांवर ढेरा की गली आणि बुल्फियाझ मार्गावर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद व दोन जण जखमी झाले होते.

Web Title: 36 soldiers martyred in three years; Rajairi, Poonch area became a new base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.