दिल्लीला येणारी ३७ विमाने प्रदूषणामुळे अन्यत्र वळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:15 AM2019-11-04T06:15:30+5:302019-11-04T06:16:06+5:30
दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) ६१० इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचला.
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदुषणात आत्यंतिक धोकादायक पातळीपर्यंत रविवारी सकाळी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत इतकी वाढ प्रथमच झाली आहे. त्याचा मोठा फटका विमानसेवेला बसला. दाट धुक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. त्यामुळे दिल्ली येथे येणारी ३७ विमाने अन्यत्र वळविण्यात आली.
दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) ६१० इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचला. त्यामुळे नॉयडा, ग्रेटर नॉयडा, गाझियाबाद परिसरातील सर्व सरकारी, खासगी शाळा व शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेसही मंगळवारपर्यंत बंद राहाणार आहेत. या बसेस प्रदुषणात मोठी भर घालत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.