जिल्हा बँकेसाठी ३७३४ मतदार अंतिम यादी जाहीर : दहा दिवसानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होणार

By admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली़ अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसात निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाणार असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३७३४ मतदारांचे ठराव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिली़

3734 voters for district bank released final list: After ten days election process will start | जिल्हा बँकेसाठी ३७३४ मतदार अंतिम यादी जाहीर : दहा दिवसानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होणार

जिल्हा बँकेसाठी ३७३४ मतदार अंतिम यादी जाहीर : दहा दिवसानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होणार

Next
मदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली़ अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसात निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाणार असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३७३४ मतदारांचे ठराव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिली़
गेल्या दोन महिन्यांपासून बँकेच्या सभासद संस्थांच्या नावाचे ठराव घेण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरु होती़ त्यानंतर २ मार्च रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती़ प्रारूप यादीत ३ हजार ५३८ मतदारांची नावे प्रसिध्द करण्यात आली होती़ त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या़ या हरकतीनंतर बुधवारी अंतिम यादीत मतदारांची संख्या वाढून ३७३४ वर पोहोचली़ पुढील पाच वर्षांसाठी या निवडणुकीतून बँकेचे संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे़ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे़ एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार असल्यामुळे राजकीय हलचालींनी जिल्हा ढवळून निघणार आहे़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
संस्थेचे नाव मतदारसंख्या
वि़का़से़सोसायटी १३०२
शेतीपूरक संस्था १०६७
बिगरशेती संस्था १३६५
एकूण ३७३४
़़़़़़़़़़़़़़़़़
पुन्हा घेणार ठराव
जिल्ह्यातील सुमारे सव्वासहाशे विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका सुरु आहेत़ यामध्ये काही सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होऊन सत्तांतर झाले आहे़ तसेच काही संस्थांमध्ये सत्तांतर झाले नसले तरी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांना संधी मिळाली आहे़ त्यामुळे अशा सेवा सोसायट्यांचे नव्याने ठराव होणार आहेत़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पाच दिवस नामनिर्देशनाची मुदत राहणार आहे़ नव्याने ठराव घेणार्‍या सेवा सोसायट्यांना नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मतदारांचे ठराव द्यावे लागणार आहेत़

Web Title: 3734 voters for district bank released final list: After ten days election process will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.