मरकजमधील ३७९ कोरोना पॉझिटिव्ह; १९ जणांचा मृत्यू : १,८०० क्वारंटाइनमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:39 AM2020-04-03T02:39:36+5:302020-04-03T06:35:48+5:30
महाराष्ट्रातील दोन्ही मृत्यू नवी मुंबईत झाले एसून त्यापैकी एक व्यक्ती सम्मेलनाल प्रतिनिधी म्हणून आलेला फिलिपीन्सचाचा नागरिक आहे.
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘आलमी मरकज’ या तब्लिग-ए-जमात’च्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी होऊन घरी परत गेलेल्या किमान ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विविध राज्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयास कळविण्यात आली आहे.
राज्यांकडून केंद्राला कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार सकाळपर्यंत या सम्मेलनाशी संबंधित किमान १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ तेलगंममधील ,महाराष्ट्र, दिल्ली व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक व बिहारमधील प्रत्येकी एक मृत्यू तब्लिगशी संबंधित आहे.
महाराष्ट्रातील दोन्ही मृत्यू नवी मुंबईत झाले एसून त्यापैकी एक व्यक्ती सम्मेलनाल प्रतिनिधी म्हणून आलेला फिलिपीन्सचाचा नागरिक आहे. दिल्लीत दोन मृतांमध्ये एक तमिळनाडूचा तर एक मलेश्यिाचा आहे. सर्वांचा शोध पूर्ण झाल्यावर लागण झालेल्यांचा व मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
२० राज्यांमध्ये परतल्याचा संशय
केंद्र सरकारने अशा येथून गेलेल्या सर्वांना हुडकून ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल त्यांना इस्पितळांमध्ये दाखल करण्याचे व लक्षणे न दिसणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. संमेलनाला हजर राहिलेले दोन हजारांहून अधिक लोक किमान २० राज्यांमध्ये परतले असल्याचा संशय आहे. यांचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरु आहे.