दार्जिलिंग जिल्ह्यातील भूस्खलनात ३८ मृत्युमुखी
By admin | Published: July 2, 2015 02:51 AM2015-07-02T02:51:33+5:302015-07-02T02:51:33+5:30
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील तीन उपविभागांमध्ये मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या
दार्जिलिंग/सिलीगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील तीन उपविभागांमध्ये मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात किमान ३८ लोक मृत्युमुखी पडले असून असंख्य बेपत्ता आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनामुळे झालेल्या जीव आणि वित्तहानीवर दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मोदी यांच्या आदेशानुसार गृहराज्यमंत्री किरण रिजिजू तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. दार्जिलिंगसह कलिम्पोंग आणि कुर्सियांगमध्ये २५ ठिकाणी भूस्खलन झाले. या दरडी कोसळण्याने राष्ट्रीय महामार्ग १० आणि ५५ चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संपूर्ण क्षेत्राचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) युद्धपातळीवर बचावकार्य सुरूकेले आहे. (वृत्तसंस्था)