३८ वर्षीय काकू १६ वर्षीय पुतण्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:47 IST2025-03-10T10:46:35+5:302025-03-10T10:47:13+5:30

काकू पतीच्या १६ वर्षीय अल्पवयीन पुतण्याच्या प्रेमात वेडी

38 year old aunt in love with 16 year old nephew in Bihar | ३८ वर्षीय काकू १६ वर्षीय पुतण्याच्या प्रेमात

३८ वर्षीय काकू १६ वर्षीय पुतण्याच्या प्रेमात

पाटणा : बिहारच्या खगरिया जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी पुढे आली आहे. एक ३८ वर्षीय काकू आपल्या पतीच्या १६ वर्षीय अल्पवयीन पुतण्याच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि त्याच्याच सोबत राहण्यावर अडून बसली आहे.

पती श्रवण कुमारने परबत्ता पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्याचा विवाह २०१२ मध्ये कंचन देवी हिच्याबरोबर झाला. त्यांना तीन मुलेही झाली. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्याला दुसऱ्या शहरात राहून मजुरी करावी लागते. पत्नीला वेळोवेळी पैसे पाठवत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

मात्र, काही दिवसांपूर्वी पत्नीचे आपल्या अल्पवयीन पुतण्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. तो जेव्हा घरी गेला त्यावेळी दोघेही गावातून बेपत्ता झाल्याचे समजले. दोन दिवसांनी दोघेही प्रकटले आणि कंचनने सांगितले की, आता मी प्रियकराबरोबरच राहणार आहे. आपल्यालाही आता तिच्यासोबत संसार करायचा नसून मुलांचा हक्क मात्र आपल्यालाच मिळावा, असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी कंचनला बोलावून विचारणा केली. मात्र, आपल्याला आता पतीसोबत राहायचे नाही, असे तिने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले. पोलिसांनी प्रकरण तपासात ठेवले आहे.
 

Web Title: 38 year old aunt in love with 16 year old nephew in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.