बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, 39 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 11:25 AM2018-05-29T11:25:15+5:302018-05-29T11:25:15+5:30
एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला.
नवी दिल्ली - एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला. या वादळामुळे तीन राज्यात मिळून एकूण 39 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार वादळामुळे बिहारमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. तर झारखंडमध्ये 13 आणि उत्तर प्रदेशमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उकाड्यापासून हैराण झालेल्या उत्तर भारतीयांना सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण वादळ, वेगाने वाहणारे वारे आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे अनेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील काही भागात वादळी वाऱ्यांमुळे वृक्ष रस्त्यावर कोसळून वाहतूक खोळंबली.
17 people dead due to thunderstorm in different parts of #Bihar.
— ANI (@ANI) May 29, 2018
बिहारमध्ये या वादळामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. बिहारमध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर झारखंडमध्ये वादळामुळे 13 जण मृत्युमुखी पडले. तसेच 25 हून अधिक जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशात वादळ आणि विजेच्या तडाख्यात सापडून 9 जणांचा मृत्यू झाला. उन्नाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच ठिकठिकाणी झाडे पडल्याने तसेच पाणी भरल्याने वाहतून विस्कळीत झाली.
Unnao: 4 people died in the storm with lightning which lashed parts of the city this evening. All the bodies sent for postmortem. Several houses damaged and trees uprooted in the region. pic.twitter.com/WTYwgp9JqQ
— ANI UP (@ANINewsUP)17 people dead due to thunderstorm in different parts of #Bihar.
— ANI (@ANI) May 29, 2018
1001159681039978496?ref_src=twsrc%5Etfw">May 28, 2018