मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:25 PM2023-04-15T19:25:34+5:302023-04-15T19:28:13+5:30

"आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत."

4-5 BJP MLAs will join NCP Claimed by the Karnataka ncp President | मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

googlenewsNext

कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. एवढेच नाही, तर भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. हरी आर म्हणाले, "आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत. बेंगळुरूचे (माजी) महापौरही लवकरच आमच्या पक्षात सामील होऊ शकतात."

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 14 जागांवर निवडणूक लढवली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली असून त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होनार असून 13 मे रोजी मतमोजनी होईल.

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर -
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली. यात ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डीके शिवकुमार कनकापुरा आणि सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतू तिथून कोथुर्जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्य़ात आली आहे. 

कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! -
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर कर्नाटकातील भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथनीमधून तिकीट देण्यात आले आहे. सवदी यांनी भाजपने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय, भाजपाने देखील 11 विद्यमान आमदारांना घरी बसवून काँग्रेस, निजदमधून आलेल्या काही जणांना तिकीट दिले आहे. तर सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्य़ा नेत्यांनी मदत केली त्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. यामुळेच सवदी नाराज झाले होते. 

Web Title: 4-5 BJP MLAs will join NCP Claimed by the Karnataka ncp President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.