4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:17 PM2020-07-20T20:17:00+5:302020-07-20T20:18:40+5:30
90 च्या दशकात बॉलिवूडवर गोविंदाचे राज्य होते. त्यावेळचा गोविंदा सुपरस्टार होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबिंगवर कंगनाने आरोप केला होता. यानंतर अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी बॉलिवूडच्या टोळक्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्यामध्ये गोविंदाचाही समावेश झाला आहे.
बॉलिवूडमध्ये आतले आणि बाहेरचे यावरून सुरु झालेला वाद आता वेगळ्या स्तरावर पोहोचला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबिंगवर कंगनाने आरोप केला होता. यानंतर अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी बॉलिवूडच्या टोळक्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्यामध्ये गोविंदाचाही समावेश झाला आहे.
90 च्या दशकात बॉलिवूडवर गोविंदाचे राज्य होते. त्यावेळचा गोविंदा सुपरस्टार होता. गोविंदाने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर म्हटले की, त्याचे वडील अरुण कुमार राजा आणि आई निर्मला देवी कलाकार होते. तरीही मला बॉलिवूडमध्ये जम बसविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. गोविंदाने सांगितले की, त्याच्या काळात प्रोड्यूसर्सना भेटण्यासाठी तासंतास वाट पहावी लागत होती. बॉलीवूडमध्ये गट आहेत आणि 4 ते 5 लोकच बॉलिवूड चालवत आहेत, असा गंभीर आरोप गोविंदाने केला आहे.
हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलसाना गोविंदाने हे आरोप केले आहेत. आधी ज्याच्यामध्ये टॅलेट होता, त्याला काम मिळत होते. प्रत्येक सिनेमाला थिएटरमध्ये एकसारखी संधी मिळत होती. मात्र, आता असे राहिलेले नाही. आता 4-5 लोक असे आहेत जे सिनेमांचा व्यापार चालवितात. तेच ठरवितात की कोण आपल्या जवळचा आहे. हे सिनेमे चांगल्या पद्धतीने रिलिज करायचे की नाही हे लोक ठरवतात. माझे काही चांगले सिनेमे अशाच टोळक्यामुळे चांगल्या पद्धतीने रिलिज झाले नाहीत. आता गोष्टी खूप बदलत आहेत.
गोविंदाची मुलगी टीना आहूजा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर गोविंदाने सांगितले की, मी अद्याप यावर तिच्याशी बोललो नाहीय. ती तिचा मार्ग स्वत: शोधायचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिची वेळ येईल तेव्हा ती जरूर यशस्वी होईल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार
लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती
सौदी अरेबियाचे किंग सलमान हॉस्पिटलमध्ये दाखल; वय 84 वर्षे
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती