दंडातून मिळाले आरटीओला 4 कोटी
By admin | Published: December 8, 2015 01:51 AM2015-12-08T01:51:52+5:302015-12-08T01:51:52+5:30
सोलापूर : वाहन नोंदणी नूतनीकरणास विलंबापोटी आकारण्यात आलेल्या दंडापोटी आरटीओला 4 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
Next
स लापूर : वाहन नोंदणी नूतनीकरणास विलंबापोटी आकारण्यात आलेल्या दंडापोटी आरटीओला 4 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. परमिट असलेली अनेक वाहने नूतनीकरण केली जात नाहीत. रिक्षांबरोबरच टेम्पो, मालवाहू वाहनांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्राधिकरणच्या बैठकीत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी परमिट नूतनीकरणास होणार्या विलंबास दंड लावण्याची तरतूद केली. याचा सर्वात मोठा फटका रिक्षांना बसला. त्यामुळे रिक्षा चालकांची ओरड सुरू झाल्यावर दंड कपात न करता सवलत देण्यात आली. पण मालवाहू वाहनांचा प्रतिसाद मिळाला नाही. अद्यापही अशी अनेक वाहने परमिट नूतनीकरणाअभावी धावत आहेत. पण कारवाईत सापडलेल्या वाहनांकडून दंड वसूल केल्याशिवाय सोडले जात नाही. या मोहिमेतून आरटीओ कार्यालयास यंदा 4 कोटी दंड मिळाला आहे. वाहनधारकांकडून दंड वसूल करणे ही बाब चांगली नाही. पण वाहनधारकांना वेळेत परमिट नूतनीकरण करण्याची शिस्त लागावी म्हणून हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सांगितले. प्रिपेड रिक्षा योजना राबविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. 10 डिसेंबर रोजी जिल्हा प्राधिकरणाची बैठक होणार आहे. या बैठकीत दरपत्रकास मंजुरी मिळाल्यावर लागलीच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.