West Bengal Wall Collapsed: मंदिराची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 27 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:00 PM2019-08-23T13:00:10+5:302019-08-23T13:02:02+5:30
West Bengal Wall Collapsed: जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोलकाता - देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात सुरू असताना या उत्सवाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत.
West Bengal: 4 dead & 27 injured after a wall of a temple, where people were gathering to celebrate #Janmastami, collapsed in Kachua, North 24 Pargana, earlier today. pic.twitter.com/L31UrWoEa2
— ANI (@ANI) August 23, 2019
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्यांना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
West Bengal CM Mamata Banerjee has announced a compensation of Rs. 5 lakhs for the family of the deceased, Rs.1 lakh for those who got critically injured and Rs. 50,000 for others with minor injuries. https://t.co/95RZP5PNTf
— ANI (@ANI) August 23, 2019