मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले; मंडप कोसळून चौघांचा मृत्यू, 70 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 06:51 AM2018-03-31T06:51:01+5:302018-03-31T07:41:29+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे थोडक्यात बचावले आहेत.
कडपा - आंध्र प्रदेशमध्ये काल रात्री रामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून 70 जण जखमी आहे. या दुर्घटनेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे थोडक्यात बचावले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमधील कडापा जिल्ह्यात काल रात्री आठ वाजाता रामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान एक मांडव कोसळला. अचानक सुरु झालेला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. त्यानंतर क्षणार्धात मिरवणुकीत मोठा गोंधळ झाला. लोक सैरावेर पळू लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. आणि एकवेळ भाविकांमध्ये असलेल्या उत्साही वातावरणात बदल होऊन ते दुःखात बुडून गेले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कडपा जिल्ह्यातील वोंटिमिट्टा येथील कोडनड्रमा स्वामी मंदिरात काल रात्री रामनवमीनिमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक पाऊस आणि सोसाट्याचा वार सुरु झाला आणि मंडप कोसळला. रामनवमीनिमित्त आयोजित या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत हजेरी लावली होती. दरम्यान, मंडप पडल्याने लोकांमध्ये मोठी गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. यातून चंद्राबाबू नायडू देखील थोडक्यात बचावले.