बँकेतल्या त्या 4 लाख कोटींवरुन होणार 'दंगल'
By admin | Published: December 30, 2016 12:04 PM2016-12-30T12:04:16+5:302016-12-30T12:06:14+5:30
ज्यांना रक्कमेचा स्त्रोत दाखवता आलेला नाही त्यांना नोटीस बजावण्याची आयकर खात्याकडून तयारी सुरु आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर अघोषित 4 लाख कोटी रुपये बँक खात्यात जमा झाल्याचा आयकर खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्यांना या रक्कमेचा स्त्रोत दाखवता आलेला नाही त्यांना नोटीस बजावण्याची आयकर खात्याकडून तयारी सुरु आहे. 1.14 लाख बँक खात्यांमध्ये हा अघोषित पैसा जमा झाल्याची आयकर खात्याकडे माहिती आहे.
कर चुकवेगिरीची ही रक्कम असल्याचा आयकर खात्याला संशय आहे. डिपॉझिट झालेली रक्कम टॅक्स रिर्टनशी जुळवून तपासली जाणार आहे. प्रामाणिक करदाते घरात पैसा साठवून ठेवणार नाहीत असे आयकर अधिका-यांचे म्हणणे आहे.
नेहमीपेक्षा बँकेत मोठया प्रमाणावर रोकड जमा करणा-यांना आयकर खात्याकडून आतापर्यंत 5 हजार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सरकार काही करणार नाही असा लोकांचा समज आहे. आम्ही दर आठवडयाला बँकांकडून मिळणा-या माहितीचे विश्लेषण करत आहोत. ज्यांच्याकडे बेहिशोबी पैसा आहे त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करणार अशी माहिती आयकर खात्यातील अधिका-यांनी दिली.