काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:25 PM2023-07-18T18:25:37+5:302023-07-18T18:25:57+5:30

जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई

4 LeT terrorist associates arrested in Jammu Kashmir Budgam area  | काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

googlenewsNext

LeT Terrorists Arrested: जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलांनी मध्य काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे आणि SIA ने दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर छापे टाकले आहेत. त्याचवेळी पुंछमध्ये लष्कराने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी मंगळवारी दावा केला की त्यांनी सुरक्षा दलांसोबत संयुक्त कारवाई करताना मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांच्या 4 साथीदारांना अटक केली. याबाबत पोलिसांनी एका निवेदनाद्वारे माहिती दिली. गोंडीपोरा बीरवाह येथील रहिवासी मुश्ताक अहमद लोन, चेवदरा बीरवाह येथील रहिवासी अझहर अहमद मीर, अरवाह बीरवाह येथील रहिवासी इरफान अहमद सोफी आणि अरवाह बीरवाह येथील रहिवासी अबरार अहमद मलिक अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून स्फोटके व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी केस रेकॉर्डमध्ये घेण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यां विरुद्धची मोहीम सुरू ठेवत राज्य तपास संस्थेने (SIA) आज फेब्रुवारीमध्ये मारले गेलेले काश्मिरी संजय शर्मा (पंडित बँक गार्ड) यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलवामा येथील एटीएम गार्ड संजय शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दक्षिण काश्मीरमधील शोपियान, कुलगाम, अनंतनाग येथे डझनभर ठिकाणी छापे टाकण्यात आले. विशेष न्यायालयाने जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या अनुषंगाने हे शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. शर्मा यांच्या हत्येचा तपास सुरुवातीला पुलवामा पोलिसांनी केला आणि नंतर तो SIA काश्मीरकडे वर्ग करण्यात आला.

त्याचवेळी, पूंछमध्ये दहशतवादविरोधी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी, लष्कराने दावा केला की, मंगळवारी पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटच्या शिंधारा भागात झालेल्या चकमकीत चार अज्ञात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की काल सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर आणि विशिष्ट माहितीवर शोध मोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: 4 LeT terrorist associates arrested in Jammu Kashmir Budgam area 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.