महिन्याभरात ५ हत्या, मृत्यूनंतरही तरुणीवर अत्याचार अन्...; वापीमध्ये सिरियल किलरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:20 PM2024-11-29T15:20:54+5:302024-11-29T15:23:49+5:30

गुजरात पोलिसांनी वापी येथून एका सायको किलरला अटक केली आहे.

4 murders in a train Gujarat police arrested the serial killer | महिन्याभरात ५ हत्या, मृत्यूनंतरही तरुणीवर अत्याचार अन्...; वापीमध्ये सिरियल किलरला अटक

महिन्याभरात ५ हत्या, मृत्यूनंतरही तरुणीवर अत्याचार अन्...; वापीमध्ये सिरियल किलरला अटक

Gujarat Police :गुजरातपोलिसांनी हरियाणातील एका सिरियल किलरला बेड्या ठोकल्या आहेत. या २९ वर्षीय आरोपीने चार राज्यांमध्ये  चौघांची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुजरातच्या वलसाडमध्ये १९ वर्षीय तरुणीचा बलात्कार करुन हत्या केली होती. गुजरातच्या वापी पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. सिरियल किलरच्या अटकेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

गुजरातमध्ये एका सायको किलरला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही सोडले नाही. आरोपीने एका मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावर तासनतास बलात्कार केला होता. गुजरात पोलिसांनी या नराधमाचे कारनामे सर्वांसमोर आणताच सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी कोणत्याही एका राज्यात गुन्हा करत नव्हता. त्याने पाच राज्यांमध्ये विविध गुन्हे केले होते. मोठ्या मेहनतीनंतर या सायको किलरला पकडण्यात पोलिसांना यश आले.

गेल्या काही दिवसांत पाच राज्यांत चोरी, दरोडा, बलात्कार आणि खुनाच्या अशा पाच घटना सातत्याने समोर येत होत्या. ज्यामध्ये गुन्हा करण्याची पद्धत अगदी सारखीच होती. गेल्या महिनाभरात झालेल्या चार हत्यांमध्ये एक गोष्ट सारखीच होती ती म्हणजे सर्व घटना ट्रेनच्या आसपास घडल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता आरोपीला गुजरातमधील वापी येथून ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव  राहुल सिंग जाट (२९) असून तो रोहतक, हरियाणाचा रहिवासी आहे. गुजरातमधील वलसाडमध्ये १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातच राहुल सिंग जाट याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने एकामागून एक सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथे ट्रेनमध्ये खून केल्याचे तसेच ट्रेनमध्ये बलात्कार केल्याचेही राहुल सिंग जाटने पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर अटकेच्या दोनच दिवस आधी त्याने तेलंगणात एका महिलेची हत्या केली होती.

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उदवाडा रेल्वे स्थानकाजवळ १४ नोव्हेंबरला एक मृतदेह आढळून आला होता. मृत १९ वर्षीय तरुणी संध्याकाळी शिकवणी संपवून घरी परतत होती. मोबाईलवर बोलत असताना ती चालत होती. आरोपीने तिच्यावर मागून वार करून तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. मुलीची हत्या केल्यानंतरही नराधमाने तब्बल दोन तास तिच्यावर बलात्कार केला. मारेकऱ्याला भूक लागल्यावर त्याने जवळच्या दुकानात जाऊन नाश्ता केला. पाण्याची बाटली आणि कोल्ड्रिंक विकत घेतल्यानंतर तो त्याच ठिकाणी पोहोचला जिथे त्याने मुलीची हत्या केली होती. मृतदेहावर बलात्कार करण्यासाठी तो तिथे आला होता. मात्र तिथे लोक जमा झाल्याचे पाहिल्याने त्यानं आपलं सामान तिथेच टाकलं आणि  पळ काढला. 

आरोपीने त्याचे टी-शर्ट आणि बॅग घटनास्थळी सोडली होती, जो पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. या प्रकरणातील खुन्याला पकडणे अवघड होते, कारण तो वारंवार जागा बदलत राहिला. तो बहुतेक रेल्वे स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये झोपत असे. जेव्हा जेव्हा आरोपी महिलांना एकटं पाहायचा आणि त्यांना लुटून बलात्कार करायचा. महत्त्वाचे म्हणजे तो अपंग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करत होता. गेल्या वर्षभरात राहुल जाट सुरत, वलसाड आणि वापी येथे ४ ते ५ वेळा आला होता.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांसह रेल्वे पोलिसांचाही सहभाग घेतला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना २००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले. २०१८-१९ आणि २०२४ मध्ये राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ट्रक चोरी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची तस्करी प्रकरणी आरोपीला तुरुंगात टाकण्यात आले होते.

Web Title: 4 murders in a train Gujarat police arrested the serial killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.