व्हेंटिलेटरचे ऑक्सिजन संपल्याने 4 नवजात बालकांचा मृत्यू; प्रशासनात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:31 PM2022-12-05T14:31:39+5:302022-12-05T14:32:54+5:30
छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
अंबिकापूर: छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनअभावी चार नवजात बालकांचा मृत्यू झाला. या सर्व मुलांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Chhattisgarh | 4 infants died at Ambikapur Medical College allegedly due to a power cut for 4 hrs in SNCU ward last night
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 5, 2022
I've instructed Health Secy to form probe team. Going to Ambikapur Hospital to gather more info. Further action will be ensured after probe: State Health Min pic.twitter.com/J0lWxsnfEC
रात्री चार तास वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, मात्र वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने दखल घेतली नसल्याचा आरोप मृत मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे, वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने मृत मुलांच्या नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोणतीही अडचण आली नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबिकापूरचे जिल्हाधिकारीही रुग्णालयात पोहोचले. घटनेची चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी सांगितले. माहिती मिळताच आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव हेही मेडिकल कॉलेजला रवाना झाले आहेत. त्यांनी चौकशी पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.