Video : इंफाळमध्ये आयईडी स्फोट; 4 पोलीस आणि एक नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 01:02 PM2019-11-05T13:02:46+5:302019-11-05T13:23:34+5:30
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये मंगळवारी सकाळी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
इंफाळ - मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये मंगळवारी सकाळी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी 9.30 च्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयईडी स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंफाळमधील हा परिसर हाय सिक्युरिटी असणारा समजला जातो. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी तेलीपाटी परिसरात एक स्फोट झाला होता. त्यामध्ये बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते.
#WATCH CCTV footage of the IED (Improvised explosive device) blast at Thangal Bazar in Imphal today; 4 policemen and 1 civilian injured #Manipurpic.twitter.com/a4OecynFxF
— ANI (@ANI) November 5, 2019
जम्मू - काश्मीरमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.
Manipur: 4 policemen and 1 civilian injured in an IED (Improvised explosive device) blast at Thangal Bazar in Imphal. Injured have been taken to hospital. pic.twitter.com/MEg2jCdA2A
— ANI (@ANI) November 5, 2019
जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये देखील याआधी दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 20 नागरिक जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच याआधी श्रीनगरमधील करणनगर परिसरात सीआरपीएफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड फेकले होते. हा हल्ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आला होता. यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाले होते.