भयंकर! फ्रिज उघडायला गेली अन् वडिलांसमोरच लेकीचा तडफडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:52 PM2023-10-03T12:52:45+5:302023-10-03T12:53:17+5:30

वडिलांसमोरच मुलीचा तडफडून मृत्यू झाला आणि ते तिला वाचवण्यासाठी काहीही करू शकले नाहीत. वडील आणि मुलगी खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेले असताना ही घटना घडली.

4 year girl dies of electric shock while trying to open refrigerator for chocolate in telangana supermarket | भयंकर! फ्रिज उघडायला गेली अन् वडिलांसमोरच लेकीचा तडफडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

भयंकर! फ्रिज उघडायला गेली अन् वडिलांसमोरच लेकीचा तडफडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

तेलंगणाच्या राजधानीतील एका सुपरमार्केटमध्ये चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसमोरच मुलीचा तडफडून मृत्यू झाला आणि ते तिला वाचवण्यासाठी काहीही करू शकले नाहीत. वडील आणि मुलगी खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेले असताना ही घटना घडली.

निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ मंडळात सोमवारी ही दुःखद घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. ऋषिता आपले वडील राजशेखर यांच्यासोबत सुपरमार्केटमध्ये गेली होती. वडील फ्रीजमध्ये आपल्या मुलीसाठी आईस्क्रीम शोधत असताना मुलगी चॉकलेट काढण्यासाठी शेजारच्या फ्रीजमध्ये समोर गेली. 

फ्रीजच्या दरवाजाला स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला. याच दरम्यान वडील आईस्क्रीम शोधत राहिले. काही सेकंदांनंतर, जेव्हा त्यांनी शेजारी पाहिलं तर ऋषिता पडली होती आणि तिचा हात फ्रीजच्या दारावर होता. त्यांनी तातडीने मुलीला उचलून रुग्णालयात नेलं मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मुलीच्या आई-वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी सुपरमार्केटसमोर तिचा मृतदेह घेऊन निदर्शने केली आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 4 year girl dies of electric shock while trying to open refrigerator for chocolate in telangana supermarket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.