डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पित्याने केली ४ वर्षाच्या मुलीची हत्या

By Admin | Published: October 3, 2015 07:18 PM2015-10-03T19:18:23+5:302015-10-03T19:18:23+5:30

डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून उत्तरप्रदेशमधील बरेली येथे एका पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

4 year old daughter murdered by father | डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पित्याने केली ४ वर्षाच्या मुलीची हत्या

डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पित्याने केली ४ वर्षाच्या मुलीची हत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

बरेली, दि. ३ - डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून उत्तरप्रदेशमधील बरेली येथे एका पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकऱणी पोलिसांनी जाफर हुसैन याला अटक केली आहे.
बरेली येथे जाफर हुसैन,  पत्नी  व त्यांची मुलगी फरहीन (४ वर्ष) हे तिघे राहतात. शुक्रवारी दुपारी फरहीन आईसोबत जेवण करत असताना जाफर घरी परतला. फरहीनने डोके झाकले नव्हते म्हणून जाफर संतापला व संतापाच्या भरात त्याने फरहीनला जमिनीवर आपटले. यात फरहीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जाफरने मारहाण करताना थांबवण्याचा प्रयत्न करणा-या पत्नीला मारहाण केली. तसेच फरहीनचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरातच गाडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. याप्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाफरला अटक केली. 

Web Title: 4 year old daughter murdered by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.