नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 04:32 PM2020-12-31T16:32:57+5:302020-12-31T16:38:30+5:30

नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले असून, बागा, कलंगूट, मीरामार, कोलवा यांसह सर्व प्रमुख बीच फुल्ल झाले आहेत.

40 to 45 lakh tourists are recorded to have entered Goa for celebrating the new year | नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल; प्रमुख बीचवर तोबा गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देनववर्षाच्या स्वागतासाठी देशवासीयांमध्ये मोठा उत्साहनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दीगोव्याप्रमाणे कोकणातही पर्यटकांनी समुद्रकिनारे फुलले

पणजी : सन २०२० ला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. अशातच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या गोव्यातही पर्यटकांनी तोबा गर्दी गेली असून, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात तब्बल ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात ४० ते ४५ लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी आतापर्यंत गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांचा आढावा घेण्यात आला. कोरोनासंदर्भातील सर्व खबरदाऱ्या घेतल्या जात असून, पर्यटकांमध्ये याबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे, असेही प्रमोद सावंत यांनी नमूद केले. 

तत्पूर्वी गोव्यात नाइट कर्फ्यू लावण्याचा निर्णय शासनाने अधिकृतरित्या घेतलेला नाही, असेही प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या आरोग्य विभागाने राज्यात नाइट कर्फ्यू लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले होते. राणे यांच्या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

दरम्यान, गोव्यातील बागा, कलंगूट, मीरामार, कोलवा यांसह सर्व प्रमुख बीच हाऊसफुल्ल झाले आहेत. कोरोना संकटातून देश सावरत असताना हळूहळू आता रेस्टॉरंट, हॉटेल सुरू झाली आहेत. पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी गोव्यातील हॉटेल व्यवसायिकही सज्ज झालेले आहेत. गोव्यातील प्रमुख बीचवर असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीजची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गोव्याची खासियत असलेल्या वेगवेगळ्या स्पेशल सी फूडचे मेनू खास खवय्यांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

कोकणात तीन लाख पर्यटक दाखल

गोव्याप्रमाणे कोकणातही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली, देवबाग अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या कोकणात पर्यटक दाखल झाले आहेत. कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल झाले आहेत.

 

Web Title: 40 to 45 lakh tourists are recorded to have entered Goa for celebrating the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.