वाघाचे ४० मृत बछडे आढळले

By Admin | Published: June 2, 2016 02:56 AM2016-06-02T02:56:16+5:302016-06-02T02:56:16+5:30

थायलंडमध्ये ‘टायगर टेम्पल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बौद्ध मठातील वाघांना हलविण्याच्या मोहिमेदरम्यान मठातील फ्रीजरमध्ये वाघाचे ४० मृत बछडे आढळून आले.

40 dead flocks of tigers found | वाघाचे ४० मृत बछडे आढळले

वाघाचे ४० मृत बछडे आढळले

googlenewsNext

बँकाक : थायलंडमध्ये ‘टायगर टेम्पल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बौद्ध मठातील वाघांना हलविण्याच्या मोहिमेदरम्यान मठातील फ्रीजरमध्ये वाघाचे ४० मृत बछडे आढळून आले. वन्यजीवांचा छळ आणि तस्करीचा या मठावर आरोप आहे.
पोलीस व वन्यजीव अधिकाऱ्यांनी टायगर टेम्पलमधील सर्व वाघांना हलविण्याची मोहीम सोमवारी सुरू केली. त्यामुळे हा मठ लोकांसाठी बंद करण्यात आला आहे. मठातील फ्रीजरमध्ये वाघांचे बछडे आढळून आल्यानंतर वन्यजीव विभाग या प्रकरणी नवे आरोप ठेवणार आहे. हे बछडे मृत्युमुखी पडले तेव्हा एक किंवा दोन दिवसांचे होते. वाघांच्या अवयवांचा चिनी औषधांत वापर करण्यात येतो. त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. दरम्यान, मठाने यापूर्वीच तस्करीचे आरोप फेटाळले आहेत. मठातील वाघांचा जनन मृत्यूदर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. यापूर्वी बछडा मृत्यू पावल्यास त्याचा अंत्यसंस्कार केला जाई.
अमली पदार्थ दिले जात असल्याचीही होती शंका
कांचनबुरी प्रांतातील या बौद्ध मठात १३० हून अधिक वाघ होते. लोक वाघांसोबत सेल्फी घेत. हा मठ आपल्या परिसराचा अभयारण्य म्हणून प्रचार करीत होता. मात्र, वन्यजीवांची तस्करी आणि त्यांच्या छळाचे आरोप झाल्यापासून तो वादग्रस्त बनला होता. मठातील भिक्खू वाघांची बेकायदा पैदास करीत आहेत, असा आरोप होत होता तसेच वाघांना अमली पदार्थ दिले जात असल्याची शंका होती.

Web Title: 40 dead flocks of tigers found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.