मुथूट फायनान्समधून 40 किलो सोनं चोरीला

By admin | Published: December 28, 2016 01:33 PM2016-12-28T13:33:56+5:302016-12-28T13:43:35+5:30

मुथूट फायनान्सच्या हैदराबादमधील शाखेत चोरी झाली असून 40 किलो सोने चोरीला गेले आहे. नोटाबंदी निर्णायनंतर मुथूट फायनान्समध्ये चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे

40 kg gold stolen from Muthoot Finance | मुथूट फायनान्समधून 40 किलो सोनं चोरीला

मुथूट फायनान्समधून 40 किलो सोनं चोरीला

Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 28 - मुथूट फायनान्सच्या हैदराबादमधील शाखेत चोरी झाली असून 40 किलो सोने चोरीला गेले आहे. बीरामगुडा परिसरात ही चोरी झाली आहे. 8 कोटी किंमतीचे 40 किलो सोने बंदुकीचा धाक दाखवत लूटण्यात आले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच शस्त्रधारी चोर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास शाखेत घुसले. त्यावेळी शाखेत कर्मचारी साफसफाईचं काम करत होता. चोरांनी कर्मचा-याला बंदुकीचा धाक दाखवत लॉकरची तोडफोड केली आणि सोनं घेऊन फरार झाले. चोरी करण्याआधी चोरांनी सर्व सीसीटीव्ही काढून ठेवले होते. तसंच हार्ड डिस्कची आपल्यासोब घेऊन गेले. पोलीस परिसरात असलेल्या इमारतींचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. 
 
नोटाबंदी निर्णायनंतर मुथूट फायनान्समध्ये चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपुर्वी अज्ञात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत राजकोटमधील शाखेतून पाच किलो सोनं चोरलं होतं. या सोन्याची किंमत तब्बल 90 लाख रुपये होती. 
 
दुस-या घटनेत गुजरातमधील धोराजी येथील शाखेतून 90 लाख रुपये चोरीला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार तीन ते चार जणांनी मिळून ही चोरी केली होती. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. मात्र चोरीला गेलेली रक्कम जुन्या नोटांमध्ये होती की नव्या याची माहिती अजून मिळालेली नाही. त्यानंतर आता हैदराबादमध्ये ही चोरी झाली आहे. 
 

Web Title: 40 kg gold stolen from Muthoot Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.